पाचोऱ्यात स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त फुड पॅकेटचे वाटप

 

पाचोरा, प्रतिनिधी ।देशाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहील्या महीला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गरीबांना जेवणाचे फुड पाकीट वापट करण्यात आले.

जळगाव जिल्हा सोशल मीडिया व आरोग्य सेवा सेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने गरीबांना जेवणाचे फुड पाकीट व केळी वाटप कॉग्रेसचे जेष्ठ नेते प्रदीप पवार, जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

स्व. इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त गरीबांना जेवणाचे फुड पाकीट व केळी वाटप कार्यक्रमात सेवा दलचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शिरुडे, महीला कॉग्रेसच्या संगिता नेवे, अॅड. मनिषा पवार, शिवराम पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शहर अध्यक्ष राहुल शिंदे, मुकेश पाटील, गणेश पाटील, सोनु पुजारी, समाधान ढाकरे, बंन्टी सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी कॉग्रेसचे जेष्ठ नेते प्रदिप पवार यांनी जळगाव जिल्हा सोशल मीडिया व आरोग्य सेवा सेल चे कौतुक केले आणि खरोखर देशा साठी बलिदान देणार्‍या स्व. इंदिरा गांधी यांची जयंती निमित्त गरीबांना जेवण देणे म्हणजे स्व. इंदिरा गांधी नेहमी गोरगरिबांचा विचार करणार्‍या होत्या त्यामुळे कॉग्रेसने असेच कार्यक्रम घ्यावे ज्यामुळे समाजाला प्रेरणा मिळेल. कार्यक्रमासाठी आरोग्य सेवा सेल व जिल्हा सोशल मीडिया च्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content