शिक्षकांबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या भाजप नेत्याचा अमळनेरात निषेध

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधिमंडळाच्या अधिवेशनात सरसकट सर्व शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर टीका करून शिक्षकांबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंम्ब यांचा तालुक्यातील विविध संघटनांनी जाहीर निषेध करून शिक्षकांची माफी मागण्यास सांगावे, अश्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले आहे.

शिक्षकांमुळे देशाची संस्कृती, मूल्ये, संस्कार, लोकशाही टिकून आहे. देशाच्या प्रगतीत व जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असून शैक्क्षणिक कार्यासोबत अशैक्षणिक कामे लादून शिक्षकांना वेठीस धरले जाते असे असताना भाजप आमदार प्रशांत बंम्ब यांनी सर्व शिक्षकांवर आरोप केले. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समज देऊन शिक्षकांची माफी मागण्यास सांगावे, अन्यथा शिक्षकांच्या नाराजीचे व रोषाचे परिणाम शासनाला भोगावे लागतील असे निवेदन उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले आहे.

निवेदनावर माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष एस. एन. पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, टी. डी. एफ. संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे, सचिव राहुल बहिरम, गणित अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष डी.ए. धनगर, जुनी पेन्शन संघटना तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील, हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे, ओबीसी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ईश्वर महाजन, विज्ञान मंडळाचे लुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, शारीरिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघ, युवाध्यक्ष निलेश विसपुते, बी. एन. पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे पी. एम. विंचूरकर, कलाध्यापक संघटनेचे मनोहर पाटील, रोहित तेले व उमाकांत हिरे हजर होते.

Protected Content