मनवेल आश्रम शाळेजवळील अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील अनुदानीत आश्रम शाळेच्या उत्तर बाजूला वॉलकंपाऊडचे व पश्चिमेस भोनक नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले संरक्षण भीतींचे काम अतिक्रमणातील असुन ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी तेजभान अरुण पाटील यांनी तहसीलदार यांच्याकडे नुकतीच केली आहे.

साकळी शिवारात असलेल्या मनवेल येथील आश्रमशाळेचे अध्यक्ष व संचालक यांनी प्रंचड पैशाच्या बळावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असुन या अतिक्रमण मुळे मनवेल येथील नदीच्या काठावर रहीवाशी असलेल्या नागरीकांचे नुकसान व जीवीत हानी होण्याची शक्यता असुन ते धोकादायक अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावे अशी तक्रार एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जळगाव, विभागीय प्रांत अधिकारी फैजपुर व यावल तहसिलदार यांचाकडे केली असुन या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. मनवेल तालुका यावल येथे असलेली आश्रमशाळा साकळी शिवारातील     गट.न.१५३/१/३ व गट.न.१५३/१ अंतर्गत या जागेवर पश्चिमेस शाळेच्या अध्यक्ष व संचालक यांनी शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.

या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत असलेल्या आदीवासी विकास प्रकल्प कार्यलयातुन स्वच्छ निवृत्त झालेले हुकूमचंद पाटील व मुलगा  ललीत पाटील यांनी मोठ्या टेकडीवर असलेल्या गौणखनिज माती   जे.सी.बी.च्या साह्याने कोरुन सपाटीकरण करून नदीच्या बांधण्यात आलेल्या संरक्षण भितीलगत टाकल्याने पावसाळ्यातील  नैसर्गीक पाण्याच्या प्रवाह आमच्या घराकडे येणार असल्यामुळे मोठे आर्थीक व जिवीत नुकसान होण्याची शक्यता असुन सदरच्या अतिक्रमणाची तात्काळ चौकशी करुन काढण्यात यावे अशी मागणी तेजभान पाटील यांनी केली आहे.

 

 

Protected Content