धनाजी नाना महाविद्यालयात मैत्री शिबीर उत्साहात

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयात मैत्री शिबीर उत्साहात पार पडले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय मैत्री शिबीर नुकतेच पार पडले. या समारोप कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांच्यासह डॉ.पी.डी.पाटील यांची उपस्थिती होती.

समारोप समारंभाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे यांनी केले तसेच या प्रसंगी उत्कृष्ट शिबीरार्थी स्वयंसेवक म्हणून, गायत्री सुरवाडे, ईश्वर चौधरी, राजरत्न तायडे बोदवड, सलोनी भोई- मुक्ताईनगर, नेहा शिसोदिया जळगाव, यांना तर उत्कृष्ट विविध खेळांत विजयी विद्यार्थी राहुल धनगर-चोपडा व नेहा महाजन फैजपूर या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.
तसेच शिबिरातील सर्व स्तरावर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अन्वर फकीर, या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. सूत्र संचालन, डॉ.शुभांगी पाटील व डॉ.डी.एल.सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ.जयश्री पाटील यांनी मानले.

तत्पूर्वी समारोप समारंभाच्या आधी तीसर्‍यादिवसाच्या व्याख्यान सत्राचे आयोजन केले होते त्यासाठी लाभलेले वक्ते डॉ.एस.व्ही.जाधव यांनी मैत्री स्वतःशी या विषयावर मार्गदर्शन केले. दुसरे वक्ते प्रा. विलास सोळुंके यांनी मैत्री पर्यावरणाशी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा.अचल भोगे, कॅप्टन राजेंद्र राजपूत, डॉ.ताराचंद सावसाकडे, प्रा.शिवाजी मगर, प्रा.प्राजक्ता काचकुटे,प्रा.चेतना नेहते, प्रा.सरला तडवी,प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.राकेश तळेले, प्रा.जी.एस मारतळे, प्रा.शेरसिंग पाडवी, प्रा. शुभांगी पाटील, शेखर महाजन, प्रकाश भिरूड, अमित गारसे, विद्यार्थिनी प्रतिनिधी रोहिणी माळी, विद्यार्थी प्रतिनिधी राहुल करवले, स्वयंसेवक म्हणून सागर ठाकूर, दिव्या वानखेडे, गायत्री सुरवाडे, ईश्वर चौधरी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले लाभले.

Protected Content