मध्यरात्री एकाची दुचाकी पेटविली

भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर लावलेली दुचाकी पेटवून दिल्याची घटना मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नुरा शहा मोहम्मद शहा वय-४७ रा. मुस्लिम कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएम ५४१४) हिला गल्लीत राहणारा मुस्ताक शाह बशीर शाह याने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली. हा प्रकार घडल्यानंतर नुरा शहा यांचे कुटुंबिय जागे झाल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले. आरडाओरड करत गल्लीतील नागरीकांनी धाव घेवून ही आग विझविण्यात आली. नेमकी ही आग का लावली याची माहिती समोर आलेली नाही. नुरा शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुस्ताक शाह बशीर शाह याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.

Protected Content