अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणे गावातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

Protected Content