भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीजवळ भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रल्हाद शंकर बारी वय-६२ रा. पिंप्राळा, जळगाव हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास प्रल्हाद बारी हे त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीव्ही २८१८) ने सिंधी कॉलनीतून जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ५२७६)ने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रल्हाद बारी हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर प्रल्हाद बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा चालक राजू तडवी रा. शिरसोली ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content