कत्तलीसाठी आणलेल्या गुरांची सुटका

धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील कुरेशी मोहल्ल्यात कत्तलीसाठी आणलेल्या तीन गाय आणि २ वासरू यांची सुटका करण्यात आल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी रोजी मध्यरात्री अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील कुरेशी मोहल्ल्यात कत्तलीसाठी आणलेल्या तीन गाय आणि २ वासरू आणल्याची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान पथकाने सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत तीन गाय आणि २ वासरूची सुटका केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रविण तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इम्तीयाद मोहम्मद कुरेशी रा. पाळधी ता. धरणगाव याच्या विरोधात मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जून कुवारे हे करीत आहे.

Protected Content