मोदी-शाहांनी महाराष्ट्राचा सूड उगवला : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मोदी व शाहा यांच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस असून त्यांनी शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत फुट पाडून महाराष्ट्राचा सूड उगवला अशा शब्दांमध्ये शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या निकालावर भाष्य केले आहे.

काल केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मालकी ही अजितदादा पवार यांच्या गटाकडे असल्याचा निर्णय दिला होता. यानंतर आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य करतांना भाजपवर सडकून टिका केली.

आज खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निकाल हा तसा अपेक्षितच होता. शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादीतही फुट पाडण्यात मोदी व शहांना यश आले. त्यांनी महाराष्ट्राचा सूड उगवला. कधी काळी नॅशनर करप्शन पार्टी म्हणून टिका करणार्‍या पक्षाला त्यांनी मान्यता दिली. हीच मोदींची खरी गॅरंटी असल्याचा टोला देखील राऊत यांनी याप्रसंगी लगावला. तर ठाकरे तिथे शिवसेना व पवार तेथे राष्ट्रवादी हे राज्यातील जनतेला माहित असून लोक आमच्या सोबत राहतील व त्यांना धडा शिकवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांचे दौरे लवकरच सुरू होणार असून जागा वाटपही शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती शिवसेना-उध्दव बाळासाहे ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content