ब्रेकींग : शिवसेनेची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील ‘नॉटरिचेबल’

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्र राज्यातील राजकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आले असतांना शिवसेनेची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील हे देखील नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे. मुलूख मैदान तोफ देखील गायब झाल्याने शिवसेनेला पुन्हा हादरा बसला आहे. या संदर्भात टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

 

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांसह कालपासून नॉट रिचेबल होवून सुरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. बंड झालेले शिंदे यांची शिवसेनेकडून समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल दिवसभर नाट्य घडामोडी घडल्या. यात शिंदे यांनी काही आमदारांना दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचे सांगण्यात आले. काल सायंकाळ पर्यंत घडामोडी थांबल्या नाहीत.

 

अनेक जणांनी मानधरणी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून अयशस्वी ठरला. एकनाथ शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम असून आता सुरत येथून एकनाथ शिंदे यांचा गुवाहटीती रॅडिसन हॉटेल पोहचले आहे. दरम्यान, आपल्या सोबत ४० आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील नॉटरिचेबल असल्याची माहिती टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने प्रसिध्द केले आहे.

Protected Content