दुचाकी अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

सोयगाव येथे परिक्षा देण्यासाठी जात असतांना झाला अपघात

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव कंटनेरने दुचाकीला दिलेल्या धडकेत पाळधी येथील तरूण जागीच ठार झाल्याची घटना खर्चाने फाट्याजवळ घडली. अपघाती मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधन देवसिंग परदेशी (वय-२३) रा. पहूर पाळधी ता. जामनेर हा तरूण सोयगाव येथे परिक्षा देण्यासाठी मंगळवारी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता दुचाकी (एमएच १९ बीएस २३५) ने जात असतांना खर्चाने फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत समाधान परदेशी हा जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील, पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांना कळताच आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन मयत समाधान परदेशी याला ताबडतोब पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सहा महिन्यापुर्वी समाधानचे लग्न झाले होते. पाळधी येथे महालक्ष्मी ग्लास अॅल्युमिनीयम वेल्डीग दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन बहिणी असा परिवार आहे.

 

समाधान परदेशी पहुर ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करून आज दुपारी दोन वाजता पाळधी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने पाळधी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content