शरद पवारांच्या निवासस्थानी एसटी आंदोलक धडकले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एसटी आंदोलक कर्मचार्‍यांनी आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडक दिल्याने गोंधळ उडाला आहे.

काल कोर्टाच्या निर्णयामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप आटोक्यात आल्याचे मानले जात होते. मात्र कर्मचारी आज पुन्हा आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचार्‍यांनी मुबंईतल्या शरद पवारांच्य  घराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. एसटीच्या विलीनीकरणात शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप करत या कर्मचार्‍यांकडून दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी काही आंदोलनकांना ताब्यातही घेतले आहे. शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचार्‍यांनी बारमतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचार्‍यांनी दिलं आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी संपकरी कर्मचार्‍यांशी संवाद साधत त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला. ‘माझी ऐकायची तयारी आहे. तुम्ही फक्त शांतपणे बसा. मी सगळं ऐकून घ्यायला आली आहे’, असं हात जोडून सुप्रिया सुळे   यांनी आंदोलकांना आवाहन केलं. मात्र संतापलेल्या महिलांनी सुप्रिया सुळेंना घेराव घालत, त्यांना जाब विचारला.  त्यांना एसटी कर्मचार्‍यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले.

जवळपास गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचार्‍यांचं विलीकरणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र विलीनीकरणावर कोणताही निर्णय झाला नाही. कोर्टाने एसटी कर्मचार्‍यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करून नका, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र काही एसटी कर्मचारी अजूनही विलीनीकरणावर ठाम आहेत. काल कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचार्‍यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.

 

Protected Content