स्व. कालिंदीबाई पांडे मुकबधीर विद्यालयातील शीघ्र निदान उपचार केंद्राचे आ. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

पाचोरा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालय (पुणे) व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत श्री. संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उद्योजक मुकुंद बिल्दीकर, गट शिक्षणाधिकारी विकास पाटील, केंद्रप्रमुख आर. डी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे, मिनाक्षी पांडे उपस्थित होते. दिव्यांग क्षेत्रात उत्तुंग असे काम केलेल्या महानुभावांच्या लुईस ब्रेल हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर दिप प्रज्वलन करून शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटक किशोर पाटील यांनी शून्य ते सहा वयोगटातील विकासात्मक समस्या असलेल्या तालुक्यातील मुलांना चांगल्या व सूत्रबद्ध पद्धतीने संत गाडगेबाबा शिक्षण संस्था देण्यास आपण कटीबद्ध असुन शीघ्र निदान व उपचार केंद्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content