स्वार्थापलीकडे जाऊन माणसाने समाजासाठी काही करायला हवे – यजुर्वेंद्र महाजन

WhatsApp Image 2019 03 25 at 20.30.33

भडगाव प्रतिनिधी । माणसाचे आयुष्य हे समाजाने दिलेले आहे. त्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो. वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन माणसाने समाजासाठी काही करायला हवे, ही भावना घेऊन जी व्यक्ती सतत कार्यरत असते तेच समाज पुढे घेऊन जात असते. अशा माणसांची समाजाला आज नितांत गरज आहे. डाॅ. दीपक मराठे हे गेली 35 वर्षे असे कार्य नेटाने करत आहेत. म्हणूनच ते अशा सत्कारासाठी विशेष पात्र आहेत, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक प्रेरणादायी वक्ते यजुर्वेंद्र महाजन यांनी केले. ते भडगाव येथे प्रा.डॉ. दीपक मोतीराम मराठे यांच्या नागरी सत्कार समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जागृती मित्र मंडळ, जागृती सार्वजनिक वाचनालय व केशवसुत ज्ञानप्रबोधिनी यांच्यावतीने हा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दादासाहेब दिलीप पाटील, प्रा.डॉ.जे.बी. नाईक, पदार्थविज्ञान विभागाचे प्रा. डॉ.जे.व्ही. साळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. दीपक मराठे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नुकतीच पदार्थविज्ञान विषयात पीएच.डी. पदवी घोषित केली. त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य केले त्या कार्याचा गौरव करण्यासाठी या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. दीपक मराठे यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन सुनील पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी नागरी सत्कार समितीचे विजयराव देशपांडे , डॉ .विलास देशमुख , प्रा . दिनेश तांदळे, सुबोध जैन, बाळासाहेब पारख, डॉ .विलास पाटील ,ईमरान सैय्यद यांनी परिश्रम घेतले .समारंभाला नगराध्यक्ष अतुल पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. वसीम मिर्झा, नगरसेविका प्राजक्ता देशमुख, सुभाष पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, संचालक भोलाआप्पा चौधरी, विनय जकातदार, प्राचार्य डॉ.बी. एन. पाटील, प्राचार्य डाॅ. एन.एन. गायकवाड, राजेंद्र चिंचोले, समाजातील गणमान्य व्यक्ती, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक जागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सुनील कासार यांनी केले.

Add Comment

Protected Content