आमदार एकनाथराव खडसेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

eknathrao khadse

यावल प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात गरीबातील गरीब कुटुंबांपासून सर्वसामान्यांपर्यंत विविध योजना आणल्या असून त्या मतदारांपर्यंत पोहोचवून भाजपसाठी मताधिक्य मागणे प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी आज येथे शहरात व साकळी – दहिगाव गटात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात प्रतिस्पर्धी उमेदवाराला कमजोर न समजता आपण सर्वांनी मागील लोकसभेत मिळवलेल्या यशा पेक्षा अधिक कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. व एक बुथवर ३० कार्यकर्त्यांचा ताफा ही संकल्पना पक्षाने आखली असून त्याप्रमाणे कामाला लागायचे आहे. मोदी सरकारने केलेल्या कामाची पावती आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचवून भाजपसाठी मत मागायचे आहे. समोरच्या पक्षात उमेदवार आहे किंवा नाही याचे आपल्याला काहीएक घेणेदेणे नसून कोणत्याही राजकीय पक्षाला कमजोर न समजता आपण अधिक काम करावे. असे आवाहन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.आमदार हरीभाऊ जावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बाजार समिती माजी सभापती हिरालाल चौधरी, रावेर विधानसभा क्षेत्राचे हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, जि.प. सदस्य रविंद्र पाटील, वसंतराव पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पौर्णिमा फालक, रुख्माबाई भालेराव, देवयानी महाजन, रेखा चौधरी, किशोर कुलकर्णी, गोपालसिंग पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
दहिगाव येथे प्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, बाजार समिती माजी सभापती हिरालाल चौधरी, कृउबा उपसभापती राकेश फेगडे, माजी जि.प.सदस्य सुरेश पाटील, उपसरपंच देवीदास पाटील, जि.प.सदस्य रवींद्र पाटील, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी पि.डी. चौधरी,गोकुळ पाटील, डॉ. बोरसे, उज्जैनसिंग राजपूत, शोभा पाटील,रंजना पाटील, मयुर पाटील यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी भगवान बाबा पाटील,प्रेमचंद पाटील, पवन जैन यांचे सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Add Comment

Protected Content