पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन मोठ्या घोषणा

सिंधुदुर्ग-वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोकणात येऊन दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी आज पहिल्यांदा कोकण दौरा आहे. त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये राजकोट किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते आज करण्यात आलं. विशेष म्हणजे आज नौदल दिवस आहे. नौदल दिनाच्या निमित्तानेच आज विविध कार्यक्रमांचं आयोजन सिंधुदुर्गात करण्यात आलं आहे. या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्याआधी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. यावेळी मोदींनी दोन मोठ्या घोषणा केल्या.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय, अशी घोषणा दिली. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गाचं महत्त्व, तसेच सिंधुदुर्गातील किल्ल्याचं महत्त्व सांगितलं. त्यांनी शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या गौरवाची गाथा सांगितली. त्यानंतर त्यांनी दोन मोठ्या घोषणा केली. नौदलाच्या गणवेशावर आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. तसेच भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली.

Protected Content