शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके हे आपल्या कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे देहावसान झाले. लागोपाठ दोन टर्म आमदार असलेल्या लटके यांनी नगरसेवकपदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे १९९७मध्ये निवडून गेले. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले. यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले.

ऐन महापालिका निवडणुकीच्या आधी आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. आमदार रमेश लटके यांचं पार्थिक लवकरच मुंबईत आणलं जाणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: