बोगस शिक्षक भरती : एकाला अटक, इतरांचा शोध सुरू !

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरती प्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली असून इतर दहा संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत बोगस शिक्षक भरती करण्यात आल्या प्रकरणी संस्था चालकांसह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहेे. इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक शेख हारुन शेख इक्बाल या प्रकरणी फिर्याद दिली असून यात ११ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीनुसार शे.सुपडू शे.रशीद मंसुरी, शे.हनीफ शे.रशीद मंसुरी, सगिर दगडू बागवान, मुक्तार अली कादरअली, लुकमान खान गुलशेर खान, शे.रफिक शे.गुलाब, दानिश सगिर बागवान, शेख सलीम अहमद शे.सुपडू पिंजारी, शे.जब्बार सलीम कुरेशी, तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक भास्कर जे.पाटील, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी देवांग (पूर्ण नाव माहीत नाही); सगीर दगडू बागवान (मयत), मुख्तारअली कादरअली व लुकमान खान गुलशेर खान आदींचाही संशयितांमध्ये समावेश आहे.

दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित आरोपी शे.हनीफ शे.रशीद मंसुरी यांना पोलिसांनी अटक करून रावेर न्यायालयासमोर हजर केले होते. यात न्यायमूर्तींनी संशयिताला १३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या गुन्ह्याचा तपास सपोनि डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय समाधान गायकवाड करत आहेत. तर या प्रकरणातील अन्य संशयितांना शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: