आदित्य ठाकरे म्हणतात बनायचे होते अंतराळवीर, पण . . .!

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अंतराळवीर बनण्याचे स्वप्न होते. मात्र याची पूर्तता का झाली नाही याबाबतची माहिती त्यांनीच एका कार्यक्रमात सांगितली.

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलतांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, मी शाळेत असताना मला अंतराळवीर होऊन चंद्रावर जायचे होते. पण गणित आणि भौतिकशास्त्रात फारशी गती नसल्याने ते स्वप्न अपूर्ण राहिले, अशी आठवण शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितली. मी तिसरी-चौथीत असताना मला अंतराळवीर व्हावं, असं वाटत होतं. नासा किंवा इस्रोच्या माध्यमातून मला चंद्रावर जायचे होते. पण अंतराळवीर होण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्राच अभ्यास करावा लागतो, हे पुढे जाऊन मला कळाले. तेव्हापासून अंतराळवीर होण्याच्या माझ्या महत्वाकांक्षेला गळती लागली.
यावेळी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, अंतराळवीर होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर नंतर मग मी ठरवलं की राजकारणात जाऊ. राजकारणात जाण्यासाठी काहीच लागत नाही. त्यामुळे मी राजकारणात आलो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: