शिखर बँक प्रकरणी ईश्‍वरलाल जैनही गोत्यात

ishwarlal jain

जळगाव प्रतिनिधी । शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी आज गुन्हे दाखल करण्यात आले असून यात माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांचादेखील समावेश असून ते गोत्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुरींदर अरोरा यांच्यातर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. २००५ ते २०१० या दरम्यान राज्यातील अनेक सहकारी संस्थांना गैरमार्गाने कर्ज वाटप करण्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून यामुळे सुमारे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. यावर निकाल देतांना न्यायालयाने अलीकडेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे निर्देश दिले होते. यानुसार आज गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बहुतांश राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातून माजी खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या नावाचा समावेश आहे. यामुळे शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी जैन हे गोत्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content