यश गाठण्यासाठी आत्मकेंद्रित होऊन स्वतःचा शोध घ्या ; हर्षदा कुलकर्णी

IMR

जळगाव, प्रतिनिधी | स्वतःला ओळखण्यासाठी वेळ द्या , स्वतःच ला जाणून घ्या. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी वचनबद्धता आणि इच्छुक असणं महत्वाचे आहे असे प्रतिपादन हर्षदा कुलकर्णी यांनी केले. त्या के.सी. इ. इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे आयोजित कार्यशाळेत बोलत होत्या.

 

माइंडमॅपिंग करणं हे प्रगतीसाठी महत्वाचे आहे. ज्यामुळे आपल्या ध्येयापर्यंत पोहचणे सोपे होईल. नोकरीच्या मुलाखतीथं ज्ञान, व्यक्तिमत्व असणे जितक गरजेचं आहेतितकंच स्वतःचे विचार मांडणी करणे व आपले ज्ञान समोरच्या पर्यंत पोहचणं महत्वाचे आहे. पारंपारिक गोष्टींना नवीन स्वरूप देऊन त्यांना सादर करणे महत्वाचे आहे. तसेच सेल्फ डिस्कवरी , माईंडसेट ग्रोथ , इंडस्ट्री रेडीनेस, एम्प्लॉयीबिलिटी अश्या अनेक विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पुस्तकी ज्ञान प्रॅक्टिकल आयुष्यात कसे वापरले जाते ते समजावले. दुपारच्या सत्रात त्यांनी प्राध्यपकांशी हितगुज केले व बदलत्याकाळात शिक्षण पद्धतीत काय बदल अपेक्षित आहे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्सिट्यूट च्या संचालिका प्रा.डॉ शिल्पा बेंडाळे होत्या. यशस्वीतेसाठी डॉ. विशाल सांदनशीवे , अमोल पांडे , नितीन खर्चे , डॉ. श्वेता चोरडिया यांचे सहकार्य लाभले.

Protected Content