Home Cities अमळनेर मविआच्या महामोर्चासाठी आ. अनिल पाटील समर्थकांसह मुंबई येथे रवाना

मविआच्या महामोर्चासाठी आ. अनिल पाटील समर्थकांसह मुंबई येथे रवाना

0
37

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीतर्फे मुंबईत उद्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आमदार अनिल पाटील हे समर्थकांसह रवाना झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासुन सुरु असलेला भोंगळ कारभार, छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महापुरुषांविषयी सत्ताधार्‍यांकडून होणारी बेताल वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, महागाई, बेरोजगारी, अशा विविध समस्या विषयी या मोर्चाचे आयोजन उद्या ता.१७ रोजी सकाळी सकाळी ९.३० वाजता मुंबई येथे करण्यात आले आहे. या अनुषंगाने अमळनेर विधान सभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबई येथे रवाना झाले आहेत.

महाविकास आघाडीच्या या मोर्च्यातुन सद्यस्थितीत राज्य सकारच्या दुटप्पी धोरणमुळे राज्यातील सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. यातच नेहमी महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य केले जात आहेत. राज्यात कुठल्याच प्रकारचा विकासात्मक दृष्टीकोन नाही. यात कुणी आंदोलन केले तर त्यांचा आवाज दाबून टाकून हुकूमशाही वृत्तीचा प्रकार वाढलेला असल्याने महाविकास आघाडीने मुंबई येथे राज्यातील लाखो जनतेच्या उपस्थितीत हल्ला बोल मोर्च्याचे आयोजन केले आहे.

अमळनेर तालुक्यातून अमळनेर राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रतोद तसेच विधानसभेचे आमदार अनिल पाटील, यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी,असंख्य नागरिक या मोर्च्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत.


Protected Content

Play sound