उद्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदीचा होणार शुभारंभ

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदीचे केंद्र शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समीती यावल येथे आ.लताताई सोनवणे, आ.शिरीष मधुकरराव चोधरी, खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते काटापुजन व धान्य पुजन होणार आहे.

रविवार दि. १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता हरभरा खरेदीस शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग अधीकारी, तहसीलदार महेश पवार, यावल,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती तुषार पाटील ( मुन्नाभाऊ ), उपसभापती उमेश पाटील व सर्व संचालक मंडळ , जिल्हा परीषदचे आरोग्य सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ) , जिल्हा परिषदच्या सदस्य सविता अतुल भालेराव , पंचायत समीती सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, उपसभापती योगेश दिलीप भंगाळे, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील व दिपक अण्णा पाटील यांच्यासह सर्व सन्मानिय पंचायत समिती सदस्य, खरेदी उपाभिकर्ता वि.का सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व त्यांचे सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री सहकारी संस्था यावलचे चेअरमन अमोल भिरूड व त्यांचे सर्व संचालक मंडळ, सर्व राजकीय पक्षाचे तालुका प्रमुख व पदाधीकारी, कृ.उ.बा.सचिव उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन वि. का. सो. कोरपावली सचिव निमंत्रक मुकुंदा वामन तायडे यांनी केले आहे.

Protected Content