अमळनेर तालुक्यातील सतरा लाभार्थ्यांना मिळाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सतरा लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 17 कुटुंबाना मंजुरी मिळाल्याने नुकतेच आ.अनिल पाटलांच्या हस्ते प्रत्येकी 20 हजार रकमेचे धनादेश वितरण अमळनेर तहसील कार्यालयात करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व लाभार्थी कुटुंबातील वारस उपस्थित होते.आमदार अनिल पाटील यांच्या कार्यकाळात म्हणजेच 2019 पासून आतापर्यंत 71 कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला असल्याने पीडित कुटुंबाना दिलासा मिळाला आहे,सदर मदतीबद्दल सर्व कुटुंबीयांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

या 17 कुटुंबाना मिळाला लाभ

मयत दिलीप दौलत पवार यांचे वारस सुनंदाबाई दिलीप पवार रा.खौशी, मयत महेंद्र निंबा पाटील यांचे वारस भारतीबाई महेंद्र भामरे रा.गोवर्धन, मयत काशिनाथ नजर पवार यांचे वारस आक्काबाई काशिनाथ भिल (पवार) रा.धानोरा, मयत भिकण रतन भोई यांचे वारस शोभाबाई भिकण भोई रा.मांडळ, मयत अशोक जगन्नाथ पाटील यांचे वारस लताबाई अशोक पाटील रा.देवगाव, मयत दिलीप पंडित नावरकर यांचे वारस उषाबाई दिलीप नावरकर रा.तलवाडे, मयत अशोक मोतिराम पेंडेमांग यांचे वारस शोभा अशोक पेंडेमांग रा.पातोंडा, मयत सुदाम नारायण भिल यांचे वारस धुपाबाई सुदाम भिल रा.बाम्हणे, मयत प्रकाश अभिमान भिल यांचे वारस आशाबाई प्रकाश भिल रा.गंगापुरी, मयत भानुदास बाबुलाल पाटील यांचे वारस वैशाली भानुदास पाटील रा.कुर्हे बु., मयत सुरेश देवसिंग भिल यांचे वारस संगीता सुरेश भिल रा.रुंधाटी, मयत दिपक तुकाराम पाटील यांचे वारस ललिताबाई दिपक पाटील रा.मांडळ, मयत नारायण दगडू पाटील यांचे वारस विजया नारायण पाटील रा.शिरूड, मयत भिकन सुकलाल शिरसाठ यांचे वारस अनिता भिकन शिरसाठ रा.डांगर बु. ,मयत शरद प्रकाश पाटील यांचे वारस निर्मला शरद पाटील रा.शहापूर, मयत बापु शांताराम भिल यांचे वारस सिताबाई शांताराम भिल रा.गोवर्धन, मयत मंगल हिलाल मांग यांचे वारस कालाबाई मंगल मांग रा.दहिवद

Protected Content