तर नागरिक त्यांना घरचा रस्ता दाखवतील (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । खंडेराव नगर परिसराला विविध समस्यांनी घेरले असून आज स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे मांडल्या. यावर अभिषेक पाटील यांनी परिसराला भेट देऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका करत नागरिक त्यांना घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले.

राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी रस्ते, खंडेराव महाराज मंदिर यांना भेट देऊन समस्या जाणून घेतली. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, प्रभाग १० येथे चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. जळगाव शहारत जेवढे खड्डे आहेत त्याच्या चार पट खडे प्रभाग १० मध्ये दिसून येत आहेत. या प्रभागात स्वच्छता देखील झालेली नाही. वॉटरग्रेसवाले आहे तो कचरा उचलत नाही व बाहेरून झाडाच्या फांद्या उचलून आणत वजन वाढविण्याचा प्रकार करत आहेत. यामुळे कचरा पडून राहणं स्वाभाविक आहे. वॉटरग्रेसवाल्यांची कोणत्याही प्रकारचे काम करण्याची मानसिकता नसल्याची टिका श्री. पाटील यांनी केली.

या प्रभागातील चारही भाजपा नगरसेवकांना खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या मुद्द्यांवर लोकांनी निवडून दिले होते. यात त्यांनी या मंदिरास सभामंडप व कंपाउंड वॉल करण्याचे आश्वसन दिले होते. आज या मंदिराची पाहणी केली तर ते अतिक्रमणाच्या विळख्यात दिसून आले. या मंदिराच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसून येत असून लाईटची व्यवस्था केलेली नसल्याने नागरिक त्यांना घरचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीच्या माजी नागसेविका लता मोरे यांनी देखील आ. गिरीश महाजन यांच्यावर टिका करत महाजन यांनी लोकांची दिशाभूल करत भाजपा नागसेवक निवडून आणले असल्याचा आरोप केला आहे. आ. गिरीश महाजन यांनी खंडेराव नगरला एका वर्षात नंदनवन करण्याचे आश्वसन दिले होते.याचा उपरोधिक समाचार घेत माजी नगरसेविका लता मोरे यांनी गिरीश महाजन यांनी खंडेराव नगराचे नंदनवन झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी यावे असे आव्हान दिले आहे. येथील नागरिकांची गटर, मीटर, रस्ते द्यावेत अशी छोटी छोटी स्वप्न आहेत ती पूर्ण करावीत. स्थानिक नगरसेवक हे झोपलेले असून त्यांना जागें करावं.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3433766413312844/

 

Protected Content