शिवकॉलनीत दुभाजकाला ट्रॅक्टरची धडक; चालकावर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या एसीबीआय बँकेतील तरुण चालकाने महामार्गावरील दुभाजाला टँकरने धडक दिली यात दुभाजकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील हडीया तालुक्यातील बलीपुर येथील कमलेश रामराज गौड (वय-३९) हा सध्या खामगाव येथे वास्तव्यास आहे. तो शिवकॉलनी स्टॉपवरील एसबीआय बँकेचे टँकर (एमएच ०४ डीएस ४९३१) यावर चालक म्हणून कामाला आहे. ७ रोजी रात्री ११.३५ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत तर्रर्र असलेला कमलेश गौड याने वाहन चालवित होता. दरम्यान त्याने टँकरने महामार्गाच्या मध्यभागी लावलेल्या दुभाजकाला धडकले. यामध्ये दुभाजकासह वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी जुबेर सिराज तडवी या पोलीस कर्मचार्‍या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय सोनार हे करीत आहे.

 

Protected Content