किडनी विकाराने त्रस्त ; आजच साधा डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाशी संपर्क

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वारंवार उलटी होणे, भूक न लागणे, मळमळ होणे, दम लागणे, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत असल्यास आजच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात येवून मेडिसीन तज्ञांची भेट घ्या. कारण ह्या लक्षणांवरुन किडनी निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे निदान होत असते, मात्र घाबरु नका रुग्णालयात डायलेसिस तसेच फिस्टुला शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असून ती अगदी मोफत स्वरुपात केली जाते.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाच छताखाली तज्ञांचा सल्‍ला, विविध तपासण्या, अ‍ॅडमिट होण्याची व्यवस्था येथे आहे. किडनी विकारांची तपासणी आणि योग्य तो सल्‍ला देण्यासाठी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांसह २४ तास सेवा देण्यासाठी निवासी डॉक्टरांची एक भली मोठी टिम सेवेत आहे. तसेच रुग्णांसाठी आवश्यकतेनुसार डायलेसिसचीही येथे व्यवस्था आहे. एकाचवेळी ५ रुग्णांवर येथे डायलिसीसद्वारे उपचार केले जातात.

डायलेसिसची सुरुवात केव्हा होते?

रुग्णाला किडनी विकार बळावल्यानंतर त्याच्यावर होणारे सर्व उपचार जेव्हा निष्क्रिय ठरतात आणि किडनी निकामी होते. त्या वेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोणीतरी करणे आवश्यक असते. त्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो. डायलेसिस मशीनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. किडनीसारखेच कृत्रिमरित्या हे मशीन काम करते. त्यामुळे रक्तातील क्रिएटिन, युरियासारखे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीरातले जास्तीचे पाणी बाहेर काढले जाते. शरीरातील क्षारांचे प्रमाण हे मशीन नियंत्रणात ठेवते.

मोफत उपचार

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस तसेच फिस्टुलाचे ऑपरेशनही येथे मोफत केले जाते. मोफत उपचारांसाठी रुग्णांनी आधारकार्ड, रेशनकार्डची मुळप्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी टेक्निशियन रवि बोरसे ९८९०३७२८७५  या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Protected Content