मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे सॅनिटरी नॅपकिन मशीन भेट

sanitery napkin vending machine bhet

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील युवा नेते मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे राष्ट्रीय कन्या विद्यालयात सॅनिटरी नॅपकिन मशिन भेट देण्यात आले. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय विद्यालय कन्या शाळा चाळीसगाव येथे युवा नेते मंगेश दादा चव्हाण यांच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन मशीन शाळेला भेट देण्यात आले. असे अनेक मशीन शाळांना भेट देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण, सौ.योजना चव्हाण, सौ.कावेरी पाटील, सौ,रेखा जोशी, सौ.मनीषा गवळी, डॉ.सौ.संगीता जैन तसेच विद्यालयाच्या उप-मुख्याधिपिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण म्हणाल्या की, मुलगी प्रगतीचे प्रतीक असते. मुलींच्या शिक्षणाला अनुकूल वातावरण आहे. सावित्रीबाई फुले यांनी लावलेले हे स्त्री शिक्षणाचे रोपटे आता डेरेदार झाड झालेले आहे. मुलींनी शिक्षणासोबतच स्वच्छता बाबतही जागृत राहायला हवे. प्रत्येक महिन्याला येणार्‍या मासिक पाळीवेळी लागणारे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणारे मशीन हे त्यांच्या स्वच्छ तेच्या समस्या सोडविण्यासाठी अनुकूल ठरेल असे मत सौ. चव्हाण यांनी व्यक्त केले.

Protected Content