सहा लाखांचा ऐवजांसह चार आरोपींना अटक; ग्रामीण पोलिसांची कारवाई

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे सहा लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना चाळीसगावात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात दिवसांतच तपासाचा छडा लावून चार आरोपींना अटक केले आहे. व त्यांच्याकडून ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.

याबाबत वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस क्वार्टर येथील अंकीता प्रतीक पाटील (२५) हे आपल्या आईबरोबर २७ जानेवारी रोजी लग्नाच्या निमित्ताने मालेगावातहून चाळीसगावात आल्या. दरम्यान शहरातील एका पॅजो रिक्षात बसून हिरापूर जात असताना कपड्यांच्या बॅगेत ठेवलेले सोन्याच्या दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंकीता प्रतीक पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात २८ जानेवारी रोजी भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते. याचे तपास पोना नितीन आमोदकर हे करीत होते. दरम्यान ३ फेब्रुवारी रोजी ग्रामीण पोलीसांना गुप्तहेरांकडून माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी सापळा रचून आरोपी नामे अजय अंबादास घुमडकर (२३) रा. बस स्थानकामागे चाळीसगाव, रविंद्र मल्लु घुमडकर (२३) टाकळी प्र.चा चाळीसगाव, विकी बाबू घुमडकर (२४) रा. खरजाई रेल्वे गेट चाळीसगाव व नितेश शिवाजी पंच (२१) रा. पंचवटी नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २७,५०० रूपये रोकड व ५ लाख ८४ हजार ७०० रूपये किंमतीचे १३ तोळ्याची सोन्याची लगड असे एकूण ६ लाख १२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच चारही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सात दिवसांतच तपासाचा छडा ग्रामीण पोलिसांनी लावल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जळगांव, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ युवराज बंडू नाईक, पोना नितीन किसन आमोदकर, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना शांताराम सिताराम पवार, पोना भूपेश वंजारी, पोना प्रेमसिंग राठोड या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पोना नितीन आमोदकर व पोना शांताराम पवार हे करीत आहेत.

Protected Content