एमआयडीसीमधील कंपनीचे गोडावून फोडून मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील श्री गोपाल कृष्ण कंपनीच्या गोडावूनमध्ये असलेली १७ हजार २४० रुपयांच्या रोख रकमेसह तांब्याची वायर, ॲल्युमिनियमच्या अर्थिंग पट्ट्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शनिवारी १६ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, औद्योगिक वसाहत परिसरातील सेक्टर क्रमांक डी ९९ मध्ये श्री गोपाल कृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीचे गोडाऊन आहे. २८ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट रोजीच्या सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान गोडावूनमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करून तेथे असलेली  १७ हजार २४० रुपयांच्या रोख रक्कमसह ३० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या वायरचे सात बंडल, दहा हजार रुपये किमतीचे तांबे व ॲल्युमिनियमचे नग, १२ हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमच्या अर्थिंग पट्टीचे एक बंडल असा एकूण ६९ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी विलास दिगंबर महाले (५२, रा. जोशी पेठ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

Protected Content