जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरु

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार आठवडे बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयीक सर्व माहिती मतदारांना मिळणार आहे.

मतदार सुविधा केंद्राच्या माध्यमातून मतदानापूर्वी आपली मतदार या000.दीत नाव कसे बघायचे, स्लिप कशी काढायची, पुराव्यासाठी १२ पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे सुविधा केंद्र ८ मे पर्यंत उभारले जाणार आहेत. मतदान सुविधा केंद्र उभारून जनजागृती बाबतचे आदेश सुरु केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

याबाबत जळगांव लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा सार्वत्रीक निवडणुकीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच १३ मे २०२४ रोजी एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याव्दारे बाजारात येणाऱ्यासर्व मतदारांना निवडणुक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे त्यातमतदान केंद्राचा तपशिल, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधुन देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले वोटर हेल्पलाईन अँप बाबत मतदारांना माहिती देणे, मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले १२ पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.

Protected Content