हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून चार जणांना मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद येथील बसस्थानक येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून चार जणांना लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तरसोद गावात शनिवारी २० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून सागर शांताराम राजपूत वय-२९ या तरुणाला गावात राहणारे प्रवीण भगवान अलकारी, विनोद भगवान अलकारी, सागर विनोद अलकारी आणि संतोष तुळशीराम राजपूत या चार जणांनी लोखंडी पाईप, लाकडी दांडका आणि विटा मारून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तरुणाला मारत असताना भांडण सोडवण्यासाठी आलेले धीरज रमेश राजपूत, गिरीश बापू राजपूत आणि योगेश अशोक राजपूत यांना देखील लाकडी दांड्याने व विटांनी मारहाण करून दुखापत केली आहे. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मारहाण करणारे प्रवीण भगवान अलकारी, विनोद भगवान अलकारी, सागर विनोद अलकारी आणि संतोष तुळशीराम राजपूत सर्व रा. तरसोद ता.जळगाव या चौघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय आलियार खान हे करीत आहे.

Protected Content