अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील  भारत गॅस कंपनी समोरील रोडवरून घरी परतत असताना वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या आकाश सतीश पाटील (३०, रा. चिखली, ता. यावल) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडक देणाऱ्या वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत अधिक असे की, आकाश पाटील हा औद्योगिक वसाहत परिसरातील एका चटई कंपनीत कामाला होता. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास तो घरी येत असताना भारत गॅस कंपनीसमोर त्याला एका चारचाकी वाहनाने (क्र. एमएच १९, सीवाय ९८८२) धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा १४ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे नातेवाईक नितीन रामचंद्र पाटील (३०) यांनी शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

Protected Content