जळगाव जुने बसस्थानक परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील जुने बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मार्केटसमोर ४० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश अनिल भागवत (वय-३६) रा. हनुमान नगरजवळ, अयोध्या नगर हे गॅरेज व्यवसायिक आहे. शहरातील जुने बसस्थानकच्या मागे असलेल्या मार्केटसमोर ते कामाच्या निमित्ताने बुधवार २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीसी १२१८) ने आले.  दुचाकी पार्क करून कामासाठी निघून गेले. काम आटोपून साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीजवळ आले असता दुचाकी दिसली. शोध घेवून दुचाकी मिळाली नाही म्हणून त्यांनीशहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. योगेश भागवत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे. 

Protected Content