जिल्ह्यात ५११ कोरोना बाधीत; जळगावसह जामनेरातही वाढला संसर्ग !

जळगाव Jalgaon प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ५११ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरासह जामनेर तालुक्यातही रूग्ण संख्या वाढीस लागल्याचे अधोरेखीत झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या अहवालातून गत चोवीस तासांमध्ये ५११ कोरोना बाधीत आढळले असून याच कालावधीत जिल्ह्यातील ३१३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रूग्णसंख्येचा विचार केला असता सर्वाधीत २६७ पेशंट हे जळगाव शहरातील आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे जामनेर तालुक्यात आज दिवसभरात ७८ नवीन कोरोना बाधीत पेशंट आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यातील रूग्ण संख्या वाढीस लागली असून आज या तालुक्यात ३८ पॉझिटीव्ह दिसून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका-१२; भुसावळ तालुका-३१; धरणगाव-१६; एरंडोल-७; यावल-२; रावेर आणि पारोळा-प्रत्येकी ६; मुक्ताईनगर-२१; बोदवड-१४; अमळनेर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात एकही पेशंट आढळलेला नाही.

आजची दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात जिल्ह्यात एकाच कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे.

Protected Content