अमळनेरात २२ किलो प्लास्टिक जप्त ; विक्रेत्यास पाच हजाराचा दंड

08d9c1c4 7b32 43dd 9eae 1cc6a2fbaff7

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी कारवाई करत न्यानेश प्लास्टिक फर्म येथून तब्बल २२ किलो प्लास्टिक जप्त केले. त्यात ‘प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या डिश, चमचे, प्लास्टिकचे ग्लास आढळून आले. त्यामुळे त्यांच्याकडून ५  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.

 

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना प्रामुख्याने दुकानांना लक्ष्य करण्यात आले. जिथे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल आणि तत्सम साहित्य आढळले, तिथे कारवाई करण्यात आली. प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलच्या डिश, चमचे यांची विक्री करणाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली असून, ही कारवाई कायम राहणार आहे, असे अमळनेर नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या सर्वसामान्यांना समज देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यापुढील काळातही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारने यापूर्वीच प्लास्टिकबंदी लागू केली होती. या काळात सरकार आणि नगरपालिकेतर्फे जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने राज्यात घनकचरा व्यवस्थापन नियमान्वये प्लास्टिक बंदी केलेली असून त्यानियमान्वये अमळनेर शहरात देखील प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. सदरची कारवाई मुख्याधिकारी  शोभा बाविस्कर यांच्या आदेशान्वये प्रशासन अधिकारी  संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे , प्रभारी निरीक्षक अरविंद कदम तसेच सिटी कोऑर्डीनेटर गणेश गढरी, कर्मचारी विजय सपकाळे, फय्याज शेख, व समाधान बच्छाव यांनी दंडाची कारवाई केली.

Add Comment

Protected Content