धक्कादायक : गर्भवती महिलेने घेतला टोकाचा निर्णय !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल गावात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय-२२) रा. मनवेल ता.यावल असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शितल कोळी ही महिला आपल्या पती व कुटुंबासह वास्तव्याला होत्या. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी घरात कुणीही नसतांना तिने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. पती विजय कोळी हे घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

या घटनेची खबर मयताचे सासरे भगवान दौलत कोळी वय५७ वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.

Protected Content