चिन्मय हॉस्पिटलसमोरून व्यापाऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चिन्मय हॉस्पिटल समोरून व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, श्यामलाल राम रतन साळी (वय-४६) रा. गांधीपुरा ता.एरंडोल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते त्यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ६२३५) ने जळगाव शहरातील चिन्मय हॉस्पिटल येथे आले होते. त्याठिकाणी हॉस्पिटलच्या समोर त्यांनी दुचाकी पार्क करून कामानिमित्त निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. काम आटोपून परत आल्यानंतर शामराव साळी यांना दुचाकी जागेवर मिळून आली नाही, त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी मिळून आली नाही अखेर मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भोळे करीत आहे.

Protected Content