वृध्द महिलेजवळ ६० हजाराची सोन्याची बांगडी लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक आवारात बसमध्ये चढत असतांना वृध्द महिलेजवळील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशाबाई हिरालाल चौधरी (वय-६६) रा. कळमसरे ता.अमळनेर या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने त्या महिला अमळनेर शहरात आलेल्या होत्या. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बसस्थानक आवारात असतांना शिंदखेडा ते जळगाव या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळील  ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.त्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content