रेल्वे उड्डाणपूल लवकर वाहतूकीसाठी खुला होणार – आ. भोळे (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाचे काम रखडलेले होते. या रेल्वेउड्डाण पुलाचे काम पुर्ण होणार असून शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांसाठी लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी बुधवार २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता पाहणी करतांना सांगितले

 

गेला अनेक दिवसांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. एक ना अनेक अडचणींमुळे गेल्या काळात या कामाला विलंब झाला.  त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेल किंवा शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांकडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन ही करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून या पुलाच्या कामाला गती देण्यात आली होती.

 

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी यांनी बुधवारी या पूलाच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. पूल उभारणीचे काम पूर्ण झाले असून या पूलावर रस्ता तयार करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात असून लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाची प्रयत्न सुरू आहेत.

 

त्यानुसार आमदार सुरेश भोळे यांच्यासह महापालिकेचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली तसेच या पुलावरून वाहने चालवून पूलाची चाचणी घेतली. एका बाजूने दुसऱ्या बाजूपर्यंत वाहने चालविण्यात आली. त्यामुळे आता हा पुल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.  याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी माहिती दिली आहे

Protected Content