वाळूची चोरटी वाहतूक : ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोमगाव फाट्याजवळून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा ते पाथरी गावादरम्यान असलेल्या डोमगाव फाट्याजवळून वाळूची चोरी वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीझेड ८१७) महसूल पथकाने शनिवार ११ जून रोजी सकाळी ९ वाजता पकडले. वाळू वाहतूकीचा परवानाबाबत विचारले असता ट्रॅक्टर चालकाने उडावाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पथकाने ट्रॅक्टर जप्त केले असून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. प्रदीपसिंग पुष्पसिंग राजपूत रा. निमखेडी शिवार,जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी ट्रॅक्टर चालक आणि ट्रॅक्टर मालक प्रविण पाटील रा. बिलवाडी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!