शाडूमातीच्या गणपती तयार करण्यासाठी शिक्षकाने घेतला पुढाकार

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आणि याकरता सर्वांची लगबग सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल येथील कलाशिक्षक संजय गुरव यांनी जवळपास एक हजारापेक्षा जास्त चिमुकल्यांच्या हातने .स्व मार्गदर्शनातून साडूच्या मातीचे पर्यावरण पूरक गणपती साकारून घेत स्वकृतीतून एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

आपल्या नवनवीन उपक्रमातून समाज उपयोगी उपक्रमातून सतत धडपडत असलेले संजय गुरव हे खामगाव येथील श्री अर्जंन खीमजी नॅशनल हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. 56 वर्षीय संजय गुरव हे सतत आपल्या नवनवीन अभिनव उपक्रमातून चर्चेत असतात. या वर्षी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत असतानाच आपल्या व्यस्त शैक्षणिक वेळातून देखील थेट विद्यार्थ्यांना आपल्या घरी गणपती बाप्पा घडविण्या करिता पर्यावरण पूरक शाडूच्या मातीचे गणपती साकारण्याची कार्यशाळा घेऊन कायमस्वरूपी त्यांना एक विद्येचा दैवत असलेले गणपती बाप्पा कायमस्वरूपी त्यांच्या घरी साकारण्याकरिता मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आहे.

 

कलाध्यापक म्हणून संजय माधव गुरव हे अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल, खामगाव ३३ वर्षांपासून कार्यरत असून आज पर्यंत अनेक ईको फ्रेण्डली गणेशमुर्ती कार्यशाळेत असंख्य विद्यार्थी, पालक, शिक्षक व सामाजिक संस्थाना सामिल करून घेतले.  दरवर्षीच कार्यशाळेचे आयोजन करीत असून यावर्षी ०९ सप्टेंबर २०२३ रोजी गो.से.महाविद्यालय, खामगाव, ३०० पेक्षा जास्त सहभाग, १० सप्टेबर २०२३ नॅशनल हायस्कूल, खामगाव, ३०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभाग, १२सप्टेबर २०२४ स्व.शंकरराव बोबडे काॅन्हवेन्ट, खामगाव १२० विद्यार्थी सहभाग, १५ सप्टेंबर २०२३ केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा,हिवरखेड १७० विद्यार्थी सहभाग, आज दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी येथीलच नाथ प्लाॅट मधे घरगुती पध्दतीने अगदी लहान लहान मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 

मधे वय वर्ष पाच ते सत्तरी पर्यंतचे हौशी ईको फ्रेण्डली गणेशभक्त सहभागी होत असून गेल्या तीस वर्षांत सहभाग वाढता आहे. या कार्यशाळेत गौरव इंगळे, मनोज सुडोकार, वीरेंद्र शाह, अभय अग्रवाल, गणेश कोकाटे, किशोर भागवत, गोकुळ कामे, सचिन खंडारे, अमित गुंजकर, पंकज पोतदार यांचे सहकार्य लाभत असते. एकंदरीत आज फक्त निसर्गाचा समतोल इको फ्रेंडली गणपती किंवा सण साजरे करण्याकरिता सर्व स्तरावर फक्त फोटोसेशन केले जाते पण थेट कृतीतून आणि तेही या चिमुकल्यांना याची गणपती बाप्पाची आगमनाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात त्यांना कायमस्वरूपी विद्येचा दैवत आणि विविध कलांचा अधिष्ठान असलेला गणपती बाप्पा याला घडवण्याकरिता तयार करण्याकरता मूर्ती रुपी आकार देण्याकरिता जे संजय गुरव यांनी पावले उचलले आहे प्रयत्न करत आहे ते निश्चितच गौरवास्पद आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही.

Protected Content