शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेट समोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, विजयसिंग देवसिंग राजपूत वय ४३ रा. वाल्मिक नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ते कामाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दुचाकी क्रमांक एमएच १९ सीजी ७५१८ ने आले होते. त्यावेळी त्यांनी गेटसमोर दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. त्यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती‍ मिळाली नाही. अखेर शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.

Protected Content