गोदावरी संगीत महाविद्यालयात राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी संगीत महाविद्यालय तर्फे आयोजित गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला.

यावेळी त्यांचे सोबत प्राचार्य पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, परीक्षक धुळे येथिल वीणा कमलाकर, आसावरी विंचुरकर, हे उपस्थीत होते. तर सायंकाळी समारोप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजीस्ट) प्राचार्या पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी संगीतात रियाजाला महत्व असून यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते असे सांगत संगीतामूळे मानवाला जगण्याची नवी उमेद मिळत असते. परीक्षकांनी लहान लहान पराभवातून माणूस शिकतो आणि मोठा होतो त्यामूळे या स्पर्धेत यश आले नाही तरी नाउमेद होउ नका आपल्या गाण्यातील चुका शोध कारण यातून नवीन कला निर्मीती होउ शकेल असे सांगत दर्जा काय असतो तो या स्पर्धेतून बघायला मिळाला असे सांगीतले तर डॉ. वैभव पाटील यांनी मोठा होत असतांना अनेकदा गायक कलाकारांचा हेवा वाटायचा पण आता मी मोठा झाल्यावर कळते की यासाठी परीश्रम, जिदद् व योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कलाकारांसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय हे खुले व्यासपीठ सूरु केल्यावर आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद यावर ही यशस्वी वाटचाल सुरु राहील असे आश्वासन त्यांनी दिले. एकुण 80 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा, तर सुत्रसंचालन निकीता जोशी, प्रियंका महाजन,  किरण सोनी यांनी केले. स्पर्धेची साथसंगात संवादिनी वर  सुशिल महाजन,  भुषण खैरनार, तर तबला प्रविण महाजन,  देवेद गुरव यांनी केली कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक   राजु पाटील, अनंता साठे, किशोर चौधरी, यांनी परिश्रम घेतले.

Protected Content