मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरास बंदी (व्हिडीओ )

maxresdefault

जळगाव (प्रतिनिधी ) मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर आत मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई असून असे करतांना कोणी आढळल्यास त्याचा मोबाईल जप्त करून मतमोजणी केंद्राच्या बाहेर काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल तरी कोणीही मोबाईल आणू नये असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत केले.

जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी एम.आय.डी. सी. परिसरातील राज्य वखार महामंडळच्या गोदाम क्र. १६ व १७ येथे होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी दिली. गोदाम क्र. १६ मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघाची तर गोदाम क्र. १७ येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. पोस्टल बॅलेटच्या मोजणीने मतमोजणीस सुरवात करण्यात येणार आहे तर सर्व मतमोजणी झाल्यानंतर सर्वात शेवटी ५ चिठ्ठया काढून तेथील व्हीव्ही पॅट मधील मतांची गणना करण्यात येईल. यात जर व्हीव्ही पॅट व इव्हिम मशीनमधील गणनेत तफावत आदळून आल्यास व्हीव्ही पॅटमधील मतमोजणी अंतिम असणार आहे. मतमोजणीचे प्रथम प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना शनिवार १८ मे रोजी देण्यात आले असून दुसरे प्रशिक्षण प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर उद्या बुधवार २२ मे रोजी देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहितीही श्री. ढाकणे यांनी दिली. मतमोजणीची माहिती ही मतमोजणीची माहिती हि SUVIDHA या अँपवर देण्यात येणार असल्याने प्रत्येकाला आपल्या मोबाईल, कॉम्पुटर यावर तत्काळ मिळणार असल्याचेही श्री. ढाकणे यांनी दिली.

Add Comment

Protected Content