जळगाव जिल्हा एनएसयूआय तर्फे हिंगणघाट पीडित भगिनीला श्रद्धांजली

WhatsApp Image 2020 02 10 at 19.18.26

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट येथील जळीतकांड आतील पीडितेने आज सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. जळगाव जिल्हा एनएसयुआयतर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संपूर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली दिली.

गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरले. एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे या नराधमाने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी पीडितेचा अखेरचा श्वास घेतला. हिंगणघाट घटना महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी आहे. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी जळगाव एनएसयुआयतर्फे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना विनंती करण्यात आली की, या संदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवावे अशी मागणी करण्यात आली आहे. .जळगाव जिल्हा एनएसयुआय तर्फे भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी एनएसयूआय सोशल मीडिया समन्वयक वैभव तारले, चेतन बर्डे, शुभम तिफने, भावेश पाटील पूजा तीफने,मोनिका मोरे, तुषार पाटील, रोहन नारखेडे, सनी भारंबे, सुरज राजपूत, प्रतीक खर्चे , मयुर पाटील, भुपेंद्र भारंबे आदी उपस्थित होते

Protected Content