जिल्हा परिषदेत कोरोना योद्धा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार; समृद्धी संत हिचा विशेष गौरव

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिना निमित्त महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार, सहाय्यक प्रशासन अधिकारी व प्रतिभा फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा सुर्वे, संघटनेच्या अध्यक्षा  इंदिरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना अटाळे, कार्यालय अधिक्षक आबेदा तडवी, पर्यवेक्षीका जागृती तायडे, उर्दू शिक्षिका रजिया पठाण, प्राथमिक शिक्षिका ललिता पाटील, प्रयोग शाळा तंत्रज्ञ मेघा चौधरी. डाटा ऑपरेटर वैशाली भालेराव , आरोग्य सेविकास चंद्रकला चव्हाण, आरोग्य साहिका आशा गजरे, अंगवणवाडी सेविकास अनिता पाटील, कल्पना वायसे, अंगणवाडी मदतनीस प्रमिला पाटील, मदतनीस मिना सुळे, परिचर नंदा अवचर, आशा वर्कर शोभा बारेला, स्वच्छता कर्मचारी आशा महाजन आदिंचा सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेतील सेवा निवृत्त अधिकारी चंद्रकांत संत यांची नात समृद्धी हर्षल संत हिने दिल्ली परेडमध्ये देशातील एनसीसी मुलींच्या पथकाचे नेतृत्व केले त्याबद्दल तीचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका प्रतिभा सुर्वे यांनी तर आभार शैलजा पाटील यांनी मानले.  साळवा येथील उपशिक्षिका ज्योती राणे यांनी सूत्र संचालन केले.

यशस्वीतेसाठी मंगेश बाविस्कर, अजय चौधरी, धनराज सोनवणे, संजय सुर्यवंशी, कल्पना चव्हाण, सरला पाटील, रेखा बडगुजर, रत्ना तायडे, रामेश्वर कुंभार, बळीराम सुर्यवंशी, भूषण तायडे,  वसंत बैसाणे, माधुरी बेहेरे, छाया पाटील आदिंसह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Protected Content