एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज पालक मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख अतिथी आर्किटेक्ट शशिकांत कुलकर्णी यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.के.एस. वाणी, उपप्राचार्य डॉ संजय शेखावत , डॉ जि के पटनाईक , डॉ एस एल पाटील , कार्यक्रमाचे समन्वयक प्रा कृष्णा श्रीवास्तव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा कृष्णा श्रीवास्तव यांनी केले. महाविद्यालायाचे उपप्राचार्य डॉ.संजय शेखावत यांनी पालक मेळाव्यासाठी असलेल्या सर्व उपस्थितांना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सुविधा व विविध उपक्रमांबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी अर्की शशिकांत कुलकर्णी यांनी पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी एका परिवारासारखे हितगुज करावे आणि आवश्यकता असल्यास काही सूचना कराव्यात. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी पालक आणि महाविद्यालयाच्या जाबाबदारी याची माहिती व मार्गदर्शन केले.

या पालक मेळाव्यात विद्यापिठस्तरीय परिक्षा व खेळ यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. आयोजित मेळाव्यात 250 पालक उपस्थित होते. पालकांनी दिलेल्या सूचनांचे या वेळेची निरसन केले गेले. पालक मेळावाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी अथक परिश्रम करत आहेत कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सारिका पवार व डॉ सरोज शेखावत यांनी केले व आभार प्रदर्शन सह समन्वयक डॉ.पी.पी. बोरनारे यांनी केले.

Protected Content