एमआयडीसी हद्दीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात  १५ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडील यांच्यासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता  अल्पवयीन मुलगी आजीच्या घरी गेली होता. त्यावेळी तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. अल्पवयीन मुलीचा परिसरात शोधाशोध केली परंतु मिळून आले नाही. यासंदर्भात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Protected Content