जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उद्या आकाशवाणी केंद्रावर

जळगाव प्रतिनिधी । छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन उद्या प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर, रोजी सकाळी ठिक ७:४० वाजता प्रसारित होणार आहे. जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. या मुलाखतीत जिल्हाधिकारी श्री. राऊत हे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची माहिती देणार आहेत. तसेच मतदार यादीत नव्याने नाव नोंदविणे, मतदार यादीत एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत मतदारांचे नाव वगळणे, नावाच्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे, विधानसभा मतदार संघातंर्गत पत्ता बदल करणे आदिंबाबत मतदारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत आपल्या मुलाखतीत माहिती देणार आहे. तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर निश्चितपणे ऐकावी. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

 

Protected Content